पूरग्रस्तांसाठी आजी-माजी सैनिक संघटनेचा मदतीचा हात

सोमेश्वरनगर, प्रतिनिधी


बारामती तालुका आजी-माजी सैनिक संघटनेने सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. सोमेश्वर मंदिर येथे संघटनेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ११,००० रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आला.


यावेळी ॲड. गणेश आळंदीकर यांनी अजितदादांना संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संघटनेने आतापर्यंत सुमारे १५० हून अधिक वाद कोर्ट वा पोलीस ठाण्यात न नेता सामोपचाराने मिटविले असून, सैनिक टाकळी येथे पूरग्रस्तांसाठी तीन ट्रॅक मदत साहित्य, तसेच कोरोना काळात व दरडग्रस्तांना दोन ट्रॅक धान्य व संसारोपयोगी साहित्य वाटप केले असल्याची माहिती देण्यात आली.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघटनेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. काल झालेल्या शेतकरी मेळाव्यात देखील त्यांनी सैनिक संघटनेच्या कार्याला सॅल्यूट दिला होता.


या प्रसंगी संघटनेचे संस्थापक जगन्नाथ लकडे, तक्रार निवारण समिती अध्यक्ष ॲड. गणेश आळंदीकर, अध्यक्ष ताराचंद शेंडकर, सचिव विजय साबळे, गणेश शेंडकर तसेच सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments